(रत्नागिरी)
राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरी यांच्या पुढाकाराने गोकुळाष्टमीनिमित्त विविध कला क्रीडा प्रकाराप्रमाणेच यंदापासून बुद्धिबळ स्पर्धांचे ही आयोजन करण्यात येत असून यावर्षीच्या स्पर्धेत अपराजित राहून रत्नागिरीच्या यश गोगटे याने साडेसहा गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सौरीश कशेळकर याला सहा गुणां सह उपविजेतेपदावर तर सोहम रूमडे याला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धा सात फेऱ्यांमध्ये साखळी पद्धतीने जलद बुद्धिबळ प्रकारात खेळवली गेली.
यशने स्पर्धेतील अग्रमानांकित व अनुभवी बुद्धिबळ खेळाडू अवधूत पटवर्धन याच्यासह आपला डाव बरोबरीत राखत स्पर्धेत रंजकता तर निर्माण केलीच पण त्याचबरोबर अखेरच्या फेरीत उदयोन्मुख व प्रतिभावान खेळाडू सौरीश सोबत चा डाव जिंकत आपला स्पर्धेतील विजय निश्चित केला. बारा वर्षे गटातील खेळाडू रुमिन वास्ता व आयुष रायकर यांनी खुल्या गटात साडेपाच गुण करत तसेच स्पर्धेत अनुक्रमे सहावे व आठवे स्थान पटकावत सर्वांचीच वाहवा मिळवली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राधाकृष्ण वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे, राजेश रेडीज, सनातन रेडीज, बाबू खातू, वीरेंद्र वळंजू , सिद्धार्थ बेंडके, योगेश मलुष्टे, गौतम बाष्ठे आदी उपस्थित होते.
संस्थेचे हे ९९ वे वर्ष असून गोकुळाष्टमी नंतर १०० व्या वर्षात पदार्पण करत असताना ९९ खेळाडूंचा सहभाग लाभणे असाही एक योगायोग य स्पर्धेत पाहायला मिळाला. तसेच स्पर्धेतील महिला खेळाडूंचा वाढता सहभाग पाहून देखील आयोजकांनी आनंद व्यक्त केला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी बोलताना अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे यांनी राधाकृष्ण मंदिरात होत असलेल्या कला क्रीडा कार्यातून घडलेल्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा व कलाकारांचा नामोल्लेख केला व बुद्धिबळातूनही असेच खेळाडू याच पावनभूमीतून उदयाला यावेत अशी आशाही व्यक्त केली व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. राजेश रेडीज यांनी अनेक वर्ष खंड पडलेली ही स्पर्धा पुनरुज्जीवीत करण्यासाठी पुढाकार घेतला व या स्पर्धेस दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खेळाडू व पालकांचे आभारही मानले. तसेच दरवर्षी साधारण १५ ऑगस्ट च्या दरम्यान या स्पर्धेचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात करण्यात येईल अशी ग्वाही दिली. स्पर्धेला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी राष्ट्रीय पंच चैतन्य भिडे व वरद पेठे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा विस्तृत निकाल खालील प्रमाणे:
खुला गट
विजेता यश गोगटे, उपविजेता सौरीश कशेळकर, तृतीय सोहम रूमडे.
चार ते दहा अनुक्रमे : साहस नारकर, अवधूत पटवर्धन, आयुष रायकर, निधी मुळ्ये, रूमीन वास्ता, वेद डोईफोडे, अभिजीत जावळे
पंधरा वर्षाखालील मुले
१ प्रथमेश माने
२ नंदन दामले
३ आर्यन धुळप
पंधरा वर्षाखालील मुली
१ पद्मश्री वैद्य
२ सई प्रभुदेसाई
३ सानवी दामले
बारा वर्षाखालील मुले
१ अलिक गांगुली
२ आराध्य गर्दे
३ ओम शिर्के
बारा वर्षाखालील मुली
१ निराली पटेल
२ आर्या पळसुलेदेसाई
३ रमा कानविंदे
नऊ वर्षाखालील मुले
१ पारस मुंडेकर
२ शर्विल शहाणे
३ विहंग सावंत
नऊ वर्षाखालील मुली
१ अद्विता शेटे