(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांची रत्नागिरी सायबर पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. तर सायबर ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अमित आंनदराव यादव यांची संगमेश्वर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलीस निरीक्षक स्मिता सुतार ह्यांनी मार्च 2024 मध्ये संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पहिल्या महिला पोलीस निरीक्षक पदभार स्वीकारण्याचा त्यांना मान मिळाला होता. त्यांनी गेल्या सहा महिन्याच्या कार्यकाळात पोलिसांच्या सहकार्याने व जनतेला विश्वासात घेऊन ऊत्तमप्रकारे कार्यभार सांभाळला होता. त्यांची सहा महिन्यातच रत्नागिरी सायबर ठाण्यात त्या पूर्वी असलेल्या ठिकाणीच बदली झाली असून, त्या ठिकाणी असलेले पोलीस निरीक्षक अमित यादव यांची संगमेश्वर पोलीस ठाण्यात बदली झाली असून ते लवकरच येथील पदभार स्वीकारणार आहेत.