(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका बौध्दजन पंचायत समिती व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५ बसणी येथे वर्षावास कार्यक्रमानिमित्त बौद्धाचार्य आयु.रविकांत पवार यांनी भगवान गौतम बुद्धांनी समस्त मानव जातीला दिलेल्या पंचशील या विषयावर धम्म प्रवचन दिले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम कदम होते. प्रारंभी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण तालुका बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष – आयु प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना बौद्धाचार्य – संजय आयरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. त्यानंतर ज्ञात – अज्ञात दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जाती व्यवस्थेचे निर्मूलन’ या ग्रंथाच्या प्रती देऊन करण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष – विजय आयरे, कोषाध्यक्ष – मंगेश सावंत, प्रितम आयरे, सुशील सावंत व बसणी बौधजन पंचायत समितीचे पुरुष व महिला पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी उपस्थित होते.
मुख्य प्रवचनकार आयु. रविकांत पवार यांनी भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेल्या पंचशील तत्वांमधील हिंसा न करणे, चोरी न करणे, व्येभिचार न करणे, खोटे न बोलणे, व्यसन न करणे इत्यादी बाबत अतिशय अभ्यासपूर्ण विविध उदाहरणे देऊन धम्म प्रबोधन केले. तालुका अध्यक्ष प्रकाश पवार यांनी बौधजन पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कदम यांनी केले.