(रत्नागिरी)
मोबाईलवर आलेली लिंक ओपन करून त्यात माहिती भरताच क्रेडिट कार्डवरून दीड लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. रत्नागिरी शहरातील बोर्डिंग रोड परिसरात जुलै महिन्यात हा प्रकार घडला असून, पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाइलवर क्रेडिट कार्डवर असलेल्या रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी मेसेज आला. त्या लिंकवर त्यांनी क्लिक केले असता, इंटरनेट बँकिंगसारखी विंडो आली. त्यामध्ये क्रेडिट कार्डची माहिती भरल्यानंतर ओटीपी आला. तो ओटीपी ऑटोफिलमध्ये सबमिट झाला आणि क्रेडिट कार्डवरून १ लाख ५० हजार रुपये काढून घेण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.