(राजापूर)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या सरकारने माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. राज्यात नोंदणी मध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात शासनाच्या महिलांसाठीच्या सर्व योजना जास्तीत जास्त कशा राबवता येतील यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. राजापूर तालुक्यात आज आम्ही महिलांसाठी जसे श्रावण महोत्सव सारखे कार्यक्रम घेतोय तसेच मोठमोठे कार्यक्रम यापुढेही आयोजित करणार आहोत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन सिंधुरत्न समृध्द योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भय्या सामंत यांनी केले.
राजापूर शिवसेना महिला संघटनेच्या वतीने सागवे आणि देवाचे गोठणे जिल्हा परिषद गटाचा श्रावण महोत्सव मंगळागौर कार्यक्रमाचे नाटे नगर विद्यामंदिर, नाटे येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भय्या सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला अपूर्वा किरण सामंत, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ. शिल्पाताई सुर्वे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू, पक्ष निरीक्षक संदेश पटेल, तालुका प्रमुख दिपक नागले, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख सौ. मानसी आंबेकर, तालुका प्रमुख शुभांगी डबरे, उप तालुका प्रमुख प्राजक्ता पांचाळ, विभाग प्रमुख सौ. स्वरा भोसले, उप विभाग प्रमुख दिपश्री नांदगावकर, पूजा करंगुटकर, उप तालुका प्रमुख रेखा कोंडेकर, विभाग प्रमुख जान्हवी गावकर, उपविभाग प्रमुख सम्राज्ञी शिरवडकर, युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, नाटे येथील व्यावसायिक रमेश लांजेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये दोन्ही जिल्हा परिषद गटा मधून एकूण १५ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी प्रथम क्रमांक दुर्गामाता ग्रुप अणसुरे, द्वितीय क्रमांक नवलाई देवी फुगडी मंडळ नाटे आणि तृतीय क्रमांक गणेश महिला मंडळ बाकाळे यांनी पटकावले. या सर्व विजयी संघांना किरण उर्फ भय्या सामंत यांच्या हस्ते पारितोषिक, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली. तसेच उर्वरित सर्व संघांना देखील रोख रक्कम आणि पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.