(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्थेच्या मोबाईल अँपचे उदघाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी येथे पार पडला. रत्नागिरीची माध्यमिक पतपेढी ही सहकार क्षेत्रातील आदर्शवत पतपेढी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारच्या कार्यक्रमानिमित्ताने केला आहे. या शैक्षणिक पतपेढीत कधी ही राजकारण आणू नका असा सल्ला यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी संचालकांना दिला.
माध्यमिक शिक्षणकांची जी प्रतिमा आहे तीच प्रतिमा कायम ठेवा. आज मोबाईलच्या माध्यमातून अँपचे उदघाटन झाले असे पालकमंत्री म्हणून जाहीर करतो असे सांगत ते पुढे म्हणाले, मोबाईल वर अँपवर काम करताना तो फक्त आपल्या कामासाठी वापरा कारण सध्या खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम हे मोबाईलच्या माध्यमातून सुरु आहे. जुनी पेन्शनच्या बाबत सरकार प्रयत्न करत असून तुम्ही चिंताकरू नका तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहे असे पालकमंत्री म्हणाले.
लोकसभेला विरोधकांनी खोटे बोलून मत मिळवली. महायुतीचे सरकार केंद्रात आले तर संविधान बदलले जाईल आणि मुस्लिम आणि दलित लोकांना देशातून बाहेर काढले जाईल असा प्रचार केला गेला. मात्र ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली, त्यावेळेस सर्वात प्रथम संविधान डोक्याला लावून त्यांनी देशवासियांना शब्द दिला. जो पर्यत सूर्य आणि चंद्र आहेत तो पर्यत संविधान बदलले जाणार नाही आणि कोणत्याही मुस्लिम आणि दलित समाजाच्या नागरिकांला देशातून बाहेर काढले जाणार नाही. येथील शिक्षकांनी रत्नागिरीत विज्ञानभवन व्हावे यासाठी मागणी केली ती मागणी मंजुर करत लवकरच या कामाला सुरवात केली जाईल, असा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील टायलेंट विद्यार्थ्यांना नासाला नेण्याचे काम तुमच्या पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.रत्नागिरी शहर हे शैक्षणिक हब झालेय हे कोणीच नाकारू शकत नाही असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्था पतपेढीचे चेअरमन सागर पाटील, व्हाईस चेअरमन सुनील केसरकर, मानद सचिव मुनव्वर तांबोळी यांच्या सर्व सर्व सहकारी, संचालक पतसंस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.