( संगमेश्वर /प्रतिनिधी )
तालुका कुंभार समाज व युवा आघाडी संगमेश्वरच्या वतीने रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, माखजन येथे विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्यातील कुंभार समाजातील इयत्ता दहावी, बारावी,पदवी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्याचा शैक्षणिक वस्तू देऊन सन्मान केला जाणार आहे.
गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे.प्रा.मिलिंद कडवईकर हे ‘इयत्ता दहावी – बारावीनंतर पुढे काय ?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर उद्योजक अमर साळवी हे ‘ज्वेलरी क्षेत्रातील संधी ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा संगमेश्वर तालुक्यातील कुंभार समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संगमेश्वर तालुका कुंभार समाज व युवा आघाडी संगमेश्वरच्या वतीने करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर,सचिव प्रकाश साळवी,संत शिरोमणी गोरोबा काका पतसंस्था,चिपळूणचे चेअरमन तुकाराम साळवी,उपाध्यक्ष सुनिल साळवी,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष महेश पडवेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.