(रत्नागिरी)
तालुक्यातील गोळप-रनपार येथील फिनोलेक्स नगरमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तीन खोल्या फोडून चोरट्याने एकूण २५,५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना ४ ऑगस्टला रात्री १० ते ५ कालावधीत घडली. फिर्यादी गोळप-रनपारच्या फिनोलेक्स नगर फेज ३ येथील निवासस्थानात राहतात. तेथील ग्रीष्म इमारत, आकाश इमारत व प्रकाश या इमारतीतील खोल्यांच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर रोख १५,५०० रुपये आणि २० हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण ३५,५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला.