(नांदेड)
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठापासून जवळच असलेल्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या पाचपैकी चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास उघड झाली. मृत पावलेले चारही तरुण बारावीत शिकत होते. घटनेत ४ मित्रांचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नांदेड शहराजवळील झरी येथील खाणीत बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. बुडालेले चौघेही १२ वीचे विद्यार्थी होते. शेख शेख फुज्जाइल (वय १८ रा. देगलूर नाका), सय्यद सिद्दिक (वय १७, रा. टायर बोर्ड देगलूर नाका कमान,) काजी मुजम्मिल(वय १८, रा.देगलूर नाका), अफान (वय १८,रा. देगलूर नाका) हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले; पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे चौघेही बुडाले व मो.फैजान हा पाण्यात न उतरल्यामुळे बचावला आहे. हे सर्वच मित्र शहरातील देगलुर नाका भागातील रहिवासी होते.
चौघांनाही पोहता येत नव्हते. सुरुवातीला पाण्यामध्ये एक जण उतरला. त्याला वाचण्यासाठी दुस-याने पाण्यात उडी मारली असे एकूण चौघेही पाण्यात उतरले. मात्र एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच अग्निशमन पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. निर्सग सौदर्याचे फोटो काढण्यासाठी पाच जण खाणीत खाली उतरले. फोटो काढल्यानंतर पाच पैकी ४ जण पाण्यात उतरून पोहण्याचा, अंघोळ करण्याचा आनंद घेत होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही मित्र खदानीत बुडाले. त्यांच्यासोबत गेलेल्या मित्राने ही माहिती नातेवाईकांना कळवली. नातेवाईक व परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल आणि गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शोधानंतर चारही मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.