(साखरपा / दीपक कांबळे)
आधुनिकतेच्या जमान्यात पुरोगामी चालत आलेली लोककला लोप पावत असताना तिला जिवंत ठेवण्याचे काम संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे सुकम वाडी येथील कलाकार शाहीर मनोहर विश्राम सुकम यांनी आजअखेर चालू ठेवले आहे. त्यांच्या या महान कार्याची दखल त्यांचे सहकारी कलाकार मित्रमंडळी हितचिंतक घेत आहे.
मनोहर सुकम हे सुमारे 40 वर्षापासून नमन व जाखडी नृत्य या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आहे. प्रामुख्याने सुरेल आवाजातील शाहिरीतून सामाजिक धार्मिक जनजागृती करताना अंधश्रद्धा दारूबंदी साक्षरता पर्यावरण आदी विषयावर गीतांच्या बोलातून विखुरलेल्या समाजातील लोकांना एकजूट बांधून ठेवण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न ते करत आहे.
शाहीर मनोहर सुकम यांनी आपल्या गावापासून सुरुवात करीत संगमेश्वर तालुक्यात आणि जिल्ह्यात नावलौकिक मिळवले आहे. याच जोरावर आणि वाढत्या प्रतिसादामुळे मुंबईसारख्या नाट्यगृहामध्ये कला सादर करण्याची अनेक वेळा संधी त्यांना प्राप्त झाली आहे. कोकणातल्या मातीतील कला मुंबईसारखा प्रांतात गरजू लागली. त्यावेळेस खऱ्या अर्थाने मुंबईतील कोकणस्थ मंडळीची मान खऱ्या अर्थाने उंचावली तर दुसऱ्या बाजूने मनोहर यांना घेतलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे त्यांना वाटले.
शाहीर मनोहर सुकन यांचा यामुळे विविध ठिकाणी मान सन्मान सत्कार घडवून आला आहे. तर उत्कृष्ट स्पर्धक म्हणून देखील गौरविण्यात आले आहे. अशा प्रकारची कला जोपासून ठेवणाऱ्या कलाकारांचा समाजाच्या वतीने माणसांना सत्कार होत असताना शासनाने देखील याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना पुरस्कारित करून मानधन देण्याचा विचार करायला हवा अशी अपेक्षा त्यांच्या हितचिंतकांकडून केली जात आहे.