(राजापूर)
राजापूर रेल्वेस्टेशन समोरील उतारावर झालेल्या मोटरसायकल व एसटीच्या समोरा समोर धडकेत येथील तरूण गंभीर जखमी झाला त्याला असून अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले आहे. एसटी चालकांच्या प्रसगांवधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
राजापूर आगारातून सकाळी ८.३० वा. राजापूर व्हाया रेल्वेस्टेशन फुपेरे ही फेरी चालू आहे. चालक प्रकाश दुईके ही एसटी फेरी (एमएच १४ बीटी २९७५) घेऊन शुक्रवारी सकाळी रेल्वेस्टेशनता जात होते. दरम्यान सोये येथील तरूण गिरीश सौदळकर हा आपल्या ताब्यातील मोटर सायकल घेऊन ससाळे येथील दवाखानामध्ये जात होता, सोल्ये पेथील उतारावर एसटी आली असता समोरुन येणारी एसटी पाहून सौदळकर याचा गाडीवरील ताबा सुटला. सुमारे १० फुट मोटर सायकलवरून फरफटत जात सौंदळकर एसटीवर जाऊन आदळला. एसटी चालक दुईकेच्या हे लक्षात येताच आपल्या ताब्यातील एसटीचा वेग कमी करीत बस गटारामध्ये उतरविली. दरम्यान सौदळकर हा एसटीवर आदळून एसटीच्या खाली गेला. त्याच दरम्यान चालकांनेवरीत एसटीचा वेग आवरून गटारात उतरविली असल्याने सौदळकर मागील चाकाखाली जाता-जाता वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
बसवर व जमिनीवर जोरदार आपटल्याने सौंदळकरत्त्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताचे वृत्त समजात येथील रिक्षा व्यवसायिक व ग्रामस्थांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. ग्रामपंचायत सदस्य रमेश सांदळकर व त्यांच्या सहकाऱ्यानी गंभीर जखमी झालेल्या सौदळकर याला त्वरीत येचील उपचारासाठी रत्नागिरीला हलविले. चालकांच्या प्रसगांवचनामुळे मोठा अनर्थ टळला असल्याने परीसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.