(नवी मुंबई)
यशश्री शिंदे आपल्या कुटुंबीयांसह रायगड जिल्ह्यातील उरण येथे राहत होती आणि बेलापूरमधील एका कंपनीत ती काम करत होती. गुरुवारी (२५ जुलै) सकाळी कामावर निघाल्यापासून ती बेपत्ता होती. दरम्यान, उरण येथे २२ वर्षीय यशश्री हिच्या चेह-याचाच चेंदामेंदा आणि छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आएनआय स्कूलजवळ सापडला होता. या खून प्रकरणातील आरोपी बंगळुरू येथे पळून गेल्याचे समजताच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी अल्पसंख्याक समाजातील असल्याने उरण येथे तणावाचे वातावरण निर्माण आहे.
यशश्री शिंदे दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या चेहरा, शरीर, आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या. ही बातमी उरण आणि नवी मुंबईत पसरल्यानंतर नागरिकांमध्ये मोठा रोष पसरला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथील नागरिकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला योग्य शिक्षा देऊ अशी मागणी केली आहे. यशश्रीला न्याय मिळावा यासाठी उरणमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्या संख्यने उरणकर नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. उरणमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली होती.
पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळील झुडपात तिचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनाही एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या असून वैद्यकीय चाचणीनंतर बलात्कार झाल्याचे समोर आले तर तेही कलम जोडले जाईल. आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली होती. सदर आरोपीला बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे.