(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील उर्दू माध्यमाची नवीन शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण परिषदेची कुराण पठणाने सुरुवात झाली. केंद्राचे खंबीर नेतृत्व करणारे अशफाक पाते सरांनी सुरेल आवाजात नआत पठण केले. शालेय कामकाजात जोडवर्ग अध्यापनाची गरज आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात कसे गुंतवून ठेऊन शैक्षणिक दर्जा कसा वाढविता येईल या बाबत गोवळकोट उर्दू शाळेच्या शिक्षिका सुमय्या साबळे यांनी सखोल माहिती दिली.
शाळा पूर्व तयारी कशी आकर्षक करून नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळे बाबत उत्सुकता कशी वाढवता येईल. या बाबत उत्तम रित्या माहिती खेर्डी उर्दू शाळेच्या उप. शिक्षिका रफीका नाखूदा यांनी दिली. विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकासासाठी अध्यापनात शैक्षणिक साधनांचा उत्तम प्रकारे वापर कसा करावा. दैनंदिन जीवनातील प्रसंगांचा शैक्षणिक जीवनात वापर कसे करता येईल. या बाबत कालुस्ते कन्या उर्दू शाळेच्या शिक्षिका सईदा मुल्ला यांनी सखोल माहिती दिली.
शैक्षणिक कामकाजात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे क्रिडा विषय, विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रसिद्धी, विद्यार्थ्यां मध्ये आपल्या शरीराच्या देखभाली बाबत तसेच त्यांच्या कार्याची प्रसिद्धी फिट इंडिया द्वारे कशी करता येईल या बाबत स्नेह तंत्र शिक्षक अलीम करबेलकर सरांनी उत्तम मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेचे प्रमुख कार्यवाह अशफाक पाते सर आणि त्यांचे समन्वयक शौकत कारविणकर यांनी उत्तम नियोजन केले होते.
या शिक्षण परिषदे साठी चिपळूण तालुक्यातील सर्व उर्दू माध्यमाचे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मार्गदर्शन करण्याऱ्या शिक्षकांचे तसेच उत्तम रित्या सोय करून देण्याऱ्या शाळेतील शिक्षकांचे तसेच वेळेत उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे जियाऊल्ला सर यांनी आभार मानले.