(देवरुख)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित, इंदिरा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, साडवली येथील डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच D.Pharm पदविका विभागास महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई मार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास सर्वोच्च म्हणजेच “उत्कृष्ठ” दर्जा प्राप्त झाला आहे. यात महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सोई-सुविधा, प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, एकंदरीत शैक्षणिक वातावरण, विद्यार्थांना उपलब्ध होणाऱ्या नोकरी आणि व्यवसायाच्या संधी, इत्यादी विविध बाबींचा विचार करून मूल्यांकन दिले आहे.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. प्राध्यापिका अस्मी कदम आणि विभाग प्रमुख प्राध्यापक निकुल पटेल यांनी यात समन्वयक म्हणून काम पाहिले.
महाविद्यालयाने पदविका कोर्से स्थापन केल्याच्या पहिल्या वर्षी पासूनच “व्हेरी गूड” असा दर्जा प्राप्त केला होता. सदर यश संपादन करण्यासाठी संस्था अध्यक्ष श्री. रविंद्र माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने मॅडम, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वृंद तसेच महाविद्यालयीन माजी विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभल्याबद्दल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.