(मुंबई)
लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा काही बदल करण्यात आले आहेत. महायुती सरकारची ही महत्वकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळाला असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच योजना घोषीत झाल्यापासून आता पर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे, जेणे करून महिलांसाठी सुलभ होईल. या योजनेत कागदपत्रांबाबत अजूनही काही अडचणी येत होत्या. त्यामुळे काही महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत सरकारने दखल घेतली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लाडकी बहिण योजनेत आता 6 नवे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र महिलांसाठी अर्ज करणे अधिक सुलभ होणार आहे.
नवे ६ बदल कोणते? अटी शर्थी काय?
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
– एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
– केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
– नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.