(खेड / भरत निकम)
येथील समर्थ नगर व शहराजवळील भरणेनाका येथे सार्वजनिक वाहतूकीस अडथळा होईल अशी वाहने उभी करून ठेवणाऱ्या दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाया २३ जुलै रोजी करण्यात आल्या.
संपत सोमनाथ पिसे (वय ३६ ) आपले ताब्यातील वाहन गाडी क्रमांक एम. एच. ११ बी.एल.०३२९ बोलेरो पिकअप हे चारचाकी वाहन खेड समर्थनगर रेल्वे स्टेशनकडे जाणारे रोडवर रस्त्याचे बाजुला रहदारीचे ठिकाणी येणारा जाणा-या वाहनांना अडथळा होईल अशा स्थितीत मिळुन आला.
विकास राजाराम महाले (वय ४७) याने स्वतःचे ताब्यातील वाहन गाडी क्रमांक अँपे रिक्षा गाडी क्रमांक एम. एच. ०८ व्ही. १७६४ ही तीन चाकी अँपे रिक्षा खेड भरणेनाका येथील ब्रीजखालील रहदारीचे ठिकाणी येणारा जाणाऱ्या वाहनांना अडथळा होईल अशा स्थितीत मिळुन आला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.