(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालूक्यातील कळझोंडी धरणातुन 28 गावांना पाणीपुरवठा होतो. या धरणाच्या कामासाठी डिसेंबर 2023 नंतर पाणीपूरवठा बंदच होता, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे पाउस पडेपर्यंत जिंदाल कंपनीच्या मार्फत पाणी पुरवठा सुरु होता. आता धरणाचा काम पण झाले, धरण ओव्हर फ्लो भरुन वाहु लागले. नियमित पाणी पुरवठा होईल या आशेने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते, परंतु 15 जुलैच्या नंतर धरणाचा पंप जळाला, पाणी पूरवठा आठवडाभर खंडीत झाला आणि. भर पावसात वाटद-जयगड परिसरातील लोकांना पाणी पाणी करण्याची पाळी आली आहे.
आठवडा झाला तरी जिल्हापरिषद च्या पाणीपुरवठा विभागाकडुन पाहीजे तेवढी तत्परता दिसुन येत नाही परिसरातील सरपंच सतत पाठपुरावा करीत आहेत, काम त्वरीत पुर्ण व्हावे, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता यांनी विशेष लक्ष घालावे, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.