(चिपळूण)
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय,मांडकी-पालवण येथे दि. २१/०७/२०२४ रोजी गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमेनिम्मित गुरुजनांप्रति आदर व्यक्त करत गुरुजनांना गुरुदक्षिणा म्हणून छोटेसे रोप भेट म्हणून दिले.
गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयात निबंध लेखन स्पर्धा तसेच कोलाज मेकिंग च्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरूविषयी असणारा आदर व्यक्त केला. प्राध्यापक मोहिरे यांनी विद्यार्थ्यांना गुरूपौर्णिमेचे महत्व पटवून दिले. जिजामाता कृषि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सूर्यवंशी यांनी गुरुपौर्णिमा का साजरी करावी व गुरु कसा असावा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.शमिका चोरगे यांनी गुरूंचे आपल्या आयुष्यात असणारे स्थान व त्यांनी केलेले संस्कार याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संकेत कदम यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम,प्राचार्या डॉ. शमिका चोरगे,सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.