(चिपळूण)
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता 2023-24 या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) या विद्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सदर पारितोषिक वितरण गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथे पार पडले. या स्पर्धेमध्ये राज्यातील १६३ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामधील अंतिम मूल्यांकनामध्ये ४१ शाळांची निवड करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी पद्मश्री डॉ. अनिल काकोडकर, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरूश्री सुदर्शन अय्यंगार फाउंडेशनचे संचालक श्री.अशोक जैन, स्पर्धा समन्वयक श्री गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. विद्यालयाला श्री काकोडकर यांच्या हस्ते एक लाख रुपये व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बाबासाहेब भुवड, संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार श्री शेखरजी निकम, संस्थेचे सेक्रेटरी श्री महेश महाडिक, ज्येष्ठ संचालक श्री खानविलकर, व सर्व संचालक, पदाधिकारी, यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापकश्री वरेकर, उप मुख्याध्यापक श्री दाभोळकर, पर्यवेक्षक श्री पाटील, पर्यवेक्षिकासौ राजेशिर्के मॅडम, स्पर्धा समन्वयक श्री नाचणकर वाय.सी., तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.