भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
दोन्ही संघांमध्ये प्रथम टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. जे 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. BCCI ने टीम इंडियाच्या T20 संघात अनेक बदल केले आहेत. जिथे भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवच्या हातात आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल, अष्टपैलू शिवम दुबे, रिंकू सिंग, रियान पराग यांनी श्रीलंका मालिकेसाठी आपले स्थान कायम राखले आहे. रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर हे युवा खेळाडू फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मो. सिराज.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल , ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
भारत-श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक –
२७ जुलै- पहिला टी२०, पल्लेकेल
२८ जुलै- दूसरा टी२०, पल्लेकेल
३० जुलै- तिसरा टी२०, पल्लेकेल
२ ऑगस्ट – पहिला एकदिवसीय सामना, कोलंबो
४ ऑगस्ट- दूसरा एकदिवसीय सामना, कोलंबो
७ ऑगस्ट- तिसरा एकदिवसीय सामना, कोलंबो