(रत्नागिरी)
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरी परिमंडळाच्या ‘डबल गेम’ ने सांघिक नाट्यनिर्मितीत प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली.
महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. नागपूरातील वसंतराव देशपांडे सभागृहात दोन दिवसीय नाट्यस्पर्धा पार पडली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम – राजीव पुणेकर, अभिनय पुरुष : प्रथम – दुर्गेश जगताप, अभिनय स्त्री : प्रथम – श्रद्धा मुळये , नेपथ्य:द्वितीय -राजेंद्र जाधव, रंगभूषा व वेशभूषा : द्वितीय -राजश्री मोरे, उत्तेजनार्थ : अनुराधा गोखले अशी वैयक्तिक गटात पारितोषिके पटकावली. लक्ष्मीकांत आडिवरेकर, दिपक चांदणे, महेंद्र शिवलकर, दयानंद चव्हाण, पायल मुंडेकर या कलाकारांनी नाटकात भूमिका साकारल्या.
नाट्यसंघास तत्कालीन मुख्य अभियंता परेश भागवत व अधीक्षक अभियंता स्वप्निल काटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे, कैलास लवेकर, दत्तात्रय साळी, बाळासाहेब मोहिते, अजितपालसिंह दिनोरे, नितीन पळसुलेदेसाई, राजश्री मोरे, अजित अस्वले, अनुराधा आंधनसरे, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) मिलिंद कानडे, प्रणाली विश्लेषक हर्षद आपटे यांच्यासह परिमंडळातील अधिकारी- कर्मचारी व विविध संघटना पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. संघव्यवस्थापनाची जबाबदारी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी नेटाने पार पाडली. सुयोग्य व्यवस्थापन व सातत्यपूर्ण पाठपुरावा ठेवल्याने उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील यांची भूमिका नाट्य व क्रीडा स्पर्धेतील यशात मोलाची राहिली आहे. विजेत्या संघाचे प्रभारी मुख्य अभियंता कल्पना पाटील, अधीक्षक अभियंता अशोक साळुंके (सिंधुदुर्ग), वैभव पाथोडे (रत्नागिरी) यांनी कौतुक केले आहे.