(रत्नागिरी)
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला चांगलाच बसला आहे. गेले चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर काल रविवारी 14 जुलै रोजी खेड-दिवाण खवटी दरम्यान रेल्वे रूळावर दरड कोसळली. यानंतर कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. 14 तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्पच आहे. रुळावरील दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळून माती आल्याने कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. रेल्वेसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बोगद्यामध्ये दरड कोसळून ती ट्रॅकवर आल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागली. रेल्वे स्टेशनवरून ट्रेन सुरू होण्याच्या प्रतीक्षेत प्रवाशी आहेत.
दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. कोकण रेल्वे सुरु होण्यासाठी अजुनही काही काही काळ लागणार आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखलाचे साम्राज्य आहे. जवळपास १०० कामगारांच्या मदतीने ट्रॅवरवरील माती हटवण्याचे काम सुरु आहे. खेड रेल्वे स्टेशनवर काही रेल्वे गाड्या थांबवल्या आहेत.
कोकण रेल्वेकडून सात ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मंगळूरु एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस, सावंतवाडी-मडगाव पॅसेजर ट्रेनचा समावेश आहे. तसेच पाच रेल्वे दुसऱ्या मार्गाने वळवल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली आहे. श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात, मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि १२०५२ रत्नागिरी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत तर सावंतवाडी-दिवा गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवण्यात आली आहे. डाऊन मार्गावरील एलटीटी-त्रिवेंद्रम खेड येथे थांबवण्यात आली आहे. गांधीधाम-नागरकोईल विन्हेरे स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस मडगावमध्ये थांबवण्यात आली आहे. तर एलटीटी मंगळुरू एक्स्प्रेस रोहा येथे थांबली आहे.
कोकण रेल्वेच्या कोणत्या गाड्या रद्द, कोणत्या गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या? जाणून घ्या सविस्तर तपशील
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होऊन 16 तासाहून अधिक जास्त वेळ झाल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुलं यांच्यासह सर्वांचेच हाल झाले आहेत. कोकण रेल्वे ठप्प झाल्यापासून कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) वतीने आणखीन दोन तासांमध्ये रेल्वे सुरू होईल, अशी माहिती प्रवाशांसह प्रसार माध्यमांना दिली जात आहे. दरम्यान दिलेली जात असलेली माहिती अपुरी असल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 8 गाड्या रद्द, तर 12 ट्रेन इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
कोकण रेल्वेच्या कोणत्या एक्सप्रेस ट्रेन रद्द
1) गाडी क्रमांक 50103 दिवा – रत्नागिरी पॅसेंजर
2) ट्रेन क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जं. एक्सप्रेस
3) गाडी क्रमांक 20111 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “कोकण कन्या”
4) ट्रेन क्र. 11003 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “तुतारी” एक्सप्रेस
5) ट्रेन क्रमांक 50104 रत्नागिरी – दिवा पॅसेंजर
6) गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेस
7) ट्रेन क्रमांक 10105 दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेस
8) गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी रोड – मडगाव
कोणत्या एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग बदलला जाणार?
* गाडी क्र. 12742 पाटणा – वास्को दा गामा एक्सप्रेस प्रवास 13/07/2024 रोजी सुरू झाला होता. ही गाडी आता मागे वळवून कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मार्गे वळवली जाईल
* गाडी क्र. १२६१९ लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास सुरू झाला होता. ही एक्स्प्रेस ट्रेन आता रोहा येथे पाठीमागून कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – मार्गे वळवण्यात येईल.
* ट्रेन क्र. 16335 गांधीधाम- नगरकोइल जं. 12/07/2024 रोजी एक्सप्रेस प्रवास सुरू झाला होता. आता ही ट्रेन विन्हेरे येथे पाठीमागून कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मार्गे वळवण्यात येईल. मडगाव – ठोकूर – मंगळुरु जं.
* गाडी क्र. 12284 H. निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्सप्रेस प्रवास 13/07/2024 रोजी सुरू झाला होता. ही ट्रेन आता माणगावला पाठीमागून कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मार्गे वळवले जाईल. मडगाव – ठोकूर – मंगळुरु जं.
* गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेसचा प्रवास 14/07/2024 ला सुरू झाला होता. आता करंजाडी येथे पाठीमागे जाईल आणि कल्याण मार्गे वळवण्यात येईल. लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन – एर्नाकुलम.
* गाडी क्र. 22150 पुणे जं. – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस प्रवास 14/07/2024 रोजी सुरू झाला होता. ही गाडी आता कल्याण – लोणावळा – दौंड मार्गे वळवली जाईल.
* गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस प्रवास 14/07/2024 रोजी सुरू झाला होता. ही एक्सप्रेस ट्रेन आता कल्याण – लोणावळा – दौंड जंक्शन मार्गे वळवली आहे.
* ट्रेन क्र. 16335 गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस प्रवास 12/07/2024 रोजी सुरू झाला होता. ही ट्रेन कल्याण – लोणावळा – पुणे मार्गे वळवण्यात आली आहे.
* गाडी क्र. 12284 एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस प्रवास 13/07/2024 रोजी सुरू झाला होता. या गाडीची वाहतूक आता कल्याण – लोणावळा – दौंड मार्गे वळवण्यात आली आहे.
* गाडी क्र. 09057 उधना – मंगळुरू जंक्शन 14/07/2024 रोजी सुरू होणारा विशेष प्रवास वळवण्यात आला आहे. कल्याण – लोणावळा – दौंड मार्गे.
* गाडी क्र. 12742 पटना वास्को द गामा एक्सप्रेसचा प्रवास 13/07/2024 रोजी जिते येथे सुरू झाला आणि कल्याण लोणावळा पुणे मिरज लोंडा-मडगाव मार्गे वळवला जाईल.
* गाडी क्र. १२६१९ लोकमान्य टिळक (टी) मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास १४/०७/२०२४ रोजी रोहा येथे सुरू होत असून ती कल्याण- लोणावळा- पुणे- मिरज- लोंडा- मडगाव- ठोकूर मार्गे वळवली जाईल.
* ट्रेन क्र. 16335 गांधीधाम- नगरकोइल जं. 12/07/2024 रोजी विन्हेरे येथे सुरू होणारा एक्सप्रेस प्रवास कल्याण लोणावळा पुणे मिरज – लोंडा मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन मार्गे वळवला जाईल.
* गाडी क्र. 12284 H. निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्स्प्रेसचा प्रवास 13/07/2024 रोजी माणगाव येथे सुरू होतो आणि कल्याण लोणावळा पुणे मिरज – लोंडा मडगाव-ठोकूर – मंगळुरु जंक्शन मार्गे वळवला जाईल.
* Train no. 16345 Lokmanya Tilak (T) Thiruvananthapuram Central Express journey commences on 14/07/2024 now at Karanjadi will be backed & diverted via Kalyan – Lonavala – Pune – Miraj Londa Madgaon – Thokur – Mangaluru Jn – Ernakulam.
कोकण रेल्वेच्या या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
१) गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी- मंगळुरु जं. एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होतो. 14/07/2024 21.54 वाजता प्रस्थानाचे वेळापत्रक 15/07/2024 रोजी 02.00 वाजता पुन्हा शेड्यूल केले जाईल.
2) ट्रेन क्र. 11003 दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा प्रवास 2 15/07/2024 रोजी 00.05 वाजता सुटण्याच्या वेळापत्रकानुसार 03.05 वाजता पुन्हा शेड्यूल केला जाईल