( रत्नागिरी )
एस.टी. कर्मचाऱ्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने ते लिंक करून घेणे आवश्यक होते. आणि ही सदरची माहिती टी.डी.एस. द्वारे ही माहिती शासनाला दिली गेली. परंतु टीडीएस रिटर्न दाखल करण्याची मुदत आणि आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत ३१ मे २०२४ असताना त्यापूर्वीच म्हणजे कर्मचाऱ्यांनी आधार पॅन लिंक करण्यापूर्वीच रत्नागिरी एस. टी. महामंडळ कार्यालयाने टीडीएस रिटर्न दाखल केल्याने, इन्कम टॅक्स विभागाला आधार आणि पॅन लिंक नसणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील माहिती देण्यात आली.
महामंडळाने ही माहिती इन्कम टॅक्सला दिली, आपल्या कर्मचाऱ्यांची ही माहिती दिल्याने याच्या परिणामांचा विचार यावेळी करण्यात आला नाही. परिणामी टी. डी. एस. ची नोटिस एस. टी. महामंडळाला आली मग एस. टी. महामंडळाने ज्यांचे आधार आणि पॅन लिंक नाही अशा कर्मचाऱ्यांवर हा भुर्दंड लावण्यात आला, आणि ६०००० ते ७०००० रुपये कर्मचाऱ्यांकडून जुन व जुलै महिन्याच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे प्रती महा कोणाचे 30,000 तर कोणाचे 35,000 याप्रमाणे पगारातून कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुळातच कमी पगार असल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत होते. त्यातच अनेकांची कर्ज प्रकरणे, शालेय खर्चाचे करायचे काय याबाबत कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला.
सदर बाब तेथील कर्मचाऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. कोणतीही पूर्व कल्पना न देता ही वसूली लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पहायला मिळत होती. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी तातडीने आपल्या पदाधिकाऱ्यांसह तेथील अधिकारी यांची भेट घेतली व याबाबत सविस्तर चर्चा केली.
महमंडळाने कर्मचाऱ्यांवर वसूली न लावता सदर नोटिसचा अभ्यास करून टॅक्स मार्गदर्शन यांच्याकडून मार्गदर्शन घ्या व उपाययोजना करा असे अधिकारी बोडसे साहेब यांना सांगितले. याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेतो आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून टॅक्स वसुलीची नोटीस मागे घेतो. यातून काहीतरी मार्ग काढूया असा सुवर्ण मार्ग काढण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या प्रयत्नांमुळे एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणारी ही वसूली थांबल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
एस.टी. कर्मचारी यांना मी याबाबत मदत करू शकलो याचा मला आनंद असल्याचे राजेशजी सावंत यांनी बोलताना सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, युवा तालुकाध्यक्ष संकेत कदम, प्रदीप पटवर्धन कर सल्लागार आदी कार्यकर्ते आणि एस-टी कर्मचारी उपस्थित होते.