( जाकादेवी/ संतोष पवार )
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि असंख्य रूग्णांचे श्रध्दास्थान डॉ. सुजित जाधव व प्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. प्रेमराज जाधव यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता गोपाळ जाधव यांचे गुरूवार दि. ११ जुलै रोजी दु. १ वा. वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
दिवंगत सुजाता गोपाळ जाधव या अतिशय प्रेमळ, मनमिळावू, कष्टाळू, परोपकारी आणि धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या.त्यांचे पती गोपाळ जाधव गुरुजी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर असताना समाजासाठी स्वतःला झोकून देऊन काम केले. एक झुंजार जिल्हा कार्यकर्ता म्हणून ते जिल्ह्यात ओळखले जात. समाजप्रबोधन घडवून आणण्यात दिवंगत गोपाळ जाधव गुरुजी यांचा सिंहाचा वाटा होता.खेड्यापाड्यात बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केल्याने दिवंगत गोपाळ जाधव गुरुजींचे नाव आज समाजात मोठ्या आदराने घेतले जाते. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असत. यामध्ये श्रीमती सुजाता जाधव यांची त्यांना खंबीर आणि मोलाची साथ लाभली होती.
दिवंगत सुजाता जाधव यांच्यावर अंतिम संस्कार शुक्रवार दि.१२ रोजी सकाळी १० वा.आनंद नगर काॅलनी जाकिमिऱ्या येथे होणार आहे.