( खेड )
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्या वतीने नुकताच विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा तालुका अध्यक्ष श्री.शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली श्री.गणेश मंगल कार्यालय, भरणे येथे नुकताच संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद शाळेमधून इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक खेड तालुक्यातील सर्व विद्यार्थी,नवोदय निवड झालेली विद्यार्थी, नासा इस्रो यासाठी निवड झालेले विद्यार्थी, याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची एम.टी.एस.,बी.डी.एस.,के.टी.एस., आय.टी.एस., होमी भाभा, मंथन या परीक्षांमध्ये गोल्ड, सिल्वर, ब्रांझ पदक विजेते पाल्य, पाचवी आठवी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवत्ताधारक विद्यार्थी, प्राथमिक शिक्षकांची दहावी बारावी उत्तीर्ण मुले तसेच जे. ई ई.,नीट, सी.ई.टी. हे शिक्षण प्रवेशक्रम उत्तीर्ण मुले, शिक्षकांची डॉक्टर, इंजिनियर व अन्य तत्सम शिक्षणक्रम डिग्री, डिप्लोमा पूर्ण केलेली सर्व पाल्य, तसेच क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य प्राप्त केलेले पाल्य अशा सुमारे १२८ सन्मानार्थिंचा सन्मान संघटनेच्या वतीने भेटवस्तू, सन्मान चिन्ह सन्मानपत्र, गुलाब पुष्प श्रीफळ देऊन करण्यात आला करण्यात आला.
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संजय दरेकर, श्री. सखाराम मोहिते, यांचेसह केंद्रप्रमुख श्री.मंगेश भोसले, श्री. विश्वनाथ पवार, श्री. भास्कर जंगम, श्री. विजय निकम, श्री.दिलीप सावंत यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील सन २०२३/२४ मधील सेवानिवृत्त शिक्षकांसह बी.एड., एम.ए. तथा नेट- सेट, अन्य उच्च शिक्षण घेतलेले शिक्षक, जि.प. पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गुणांनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त शाळा, विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांचे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक यांना गौरवण्यात आले.
उस्फुर्त गर्दीत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवर श्री. दिलीप महाडिक, श्री. अंकुश गोफने, श्री.रुपेश महाडिक,श्री संतोष पावणे, श्री संजय दरेकर, श्री सखाराम मोहिते यांचे सह अन्य मान्यवर यांनी सदर सोहळ्याबद्दल व संघटनेच्या इतर उपक्रमांचे कौतुक केले तसेच संघटना पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ध्येय धोरणे आणि संघटनेचे शिक्षक,पालक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी सुरू असलेल्या कार्य याबद्दल सभागृहातील उपस्थित सर्व शिक्षकांना माहिती दिली व संघटनेच्या प्रवाहात आपले योगदान देऊन शिक्षक समितीच्या प्रवाहात सामील होऊन समितीचाआवाज बुलंद करून शिक्षकांना न्याय मिळवून देणाऱ्या लढ्यात सहभागी होण्याचे व त्याला साथ देण्याचे आवाहन सभागृहाला केले. शिक्षक समिती केवळ शिक्षकांसाठीच नव्हे तर पालक बालक आणि शिक्षक आणि समाज त सगळ्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे उद्गार मान्यवरांनी काढले. यावेळी खेड शाखेच्या वतीने केलेल्या नियोजनाचे आणि सूत्रबद्ध पद्धतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
या सोहळ्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी श्री संतोष भोसले साहेब यांचे सह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य ऑडिटर श्री.अंकुश गोफणे, जिल्हा शिक्षक नेते श्री.दिलीप माडीक, जिल्हा कार्याध्यक्ष श्री.रुपेश जाधव, जिल्हा सरचिटणीस श्री.संतोष पावणे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री.राजेश शिर्के, चिपळूण तालुका सचिव श्री.आर.डी. मोहिते, जिल्हा संपर्कप्रमुख विश्वास भोपे, पत्रकार श्री.दिवाकर प्रभू, प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक श्री. सुनील दळवी, जिल्हा कार्यकारणी प्रतिनिधी श्री.संजय सुर्वे, श्री. श्रीकृष्ण खांडेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
तालुका पदाधिकारी सहसचिव श्री.धर्मपाल तांबे उपाध्यक्ष श्री.अनिल यादव, प्रसिध्दी प्रमुख श्री.दिलीप यादव, श्री.अनिल मोरे, श्री. अमर चव्हाण, श्री. रघुनाथ महाडिक, श्री.नवनीत घडशी,श्री. संतोष चव्हाण, श्री. भागोजी कडव, श्री.येडू केकान, श्री.नारायण शिरकर, श्री.तुकाराम काताळे, श्री.संतोष मोरे,श्री.संतोष बर्वे, श्री. सुधाकर बामणे, श्री. नितेश कांबळे,श्री.अनंत मोरे, श्री.भारत घुटूकडे, श्री.गजानन पालांडे, श्री.अशोक पाटील, श्री.सुरसिंग ठाकरे, श्री.शशिकांत भुवड, श्री.अमोल जाधव, श्री.उदय रेडीज, श्री.भाऊसाहेब कांबळे, श्री.विजय चव्हाण, श्री.महेश शेडगे, श्री.राजेश कोरे, श्री.गोपीनाथ पवार, श्री.भिकू जानकर, श्री.चंद्रकांत पवार, श्री. केशव मुंडे, श्री.अनिल आंजर्लेकर महिला प्रतिनिधी सौ.सुविधा सावंत, सौ.दिक्षिता तांबे, सौ.दीप्ती यादव, श्रीम.रत्नप्रभा भोसले, श्रीम. स्नेहल यादव, सौ.विद्या घडशी, सौ.रसिका खांडेकर, श्रीम.लीना हरमळकर, सौ.नेहा सुर्वे, सौ.प्रतीक्षा पवार, सौ.नेहा देवरुखकर, सौ.किरण जानकर, सौ.सारिका कदम सौ.शर्वरी भोसले यांचे सह अन्य पदाधिकारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे सर्व श्रेय नियोजन करणाऱ्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे, शिक्षक समिती शिलेदार सभासद बंधू भगिनींचे, स्वेच्छेने देणगी दिलेल्या देणगीदारांचे व उपस्थित विद्यार्थी पालकांचे असल्याच्या भावना आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.शरद भोसले यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आपल्या ओघवत्या शैलीत काव्यात्मक गुंफणीतून श्री.दिपक कांबळे यांनी तर सर्व मान्यवर उपस्थितांचे व कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार श्री. अनिल मोरे यांनी मानले आणि या यशस्वी गुणगौरवाची सांगता झाली.