जय जय रघुवीर समर्थ. श्रोते अवलक्षण कसं करतात त्याची माहिती समर्थ देत आहेत. कथा कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये वादविवाद होतो. त्यामुळे त्रास होतो. शिवीगाळ, मारामारी गोंधळ होतो. कुणी निरूपणाला बसतात सावकाश भांडणे लावतात. हरिदास बिचारा पोटासाठी गाणे गात असतो. खूप जाणते मिळाले तरी एकापेक्षा एक बोलत राहतात आणि लोकांकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. माझं होऊ दे तुझं नको अशी ज्याला अखंड सवय असते न्यायनीती सोडून तो अन्यायाकडे धावतो. स्वतःच्या मोठेपणासाठी अचावचा बोलतो. तोंड वाजवतो. न्याय नाही, मोठाच अन्याय होतो. एकीकडे अभिमान निर्माण होतो, दुसरीकडे राग येतो असे श्रोते खरे की खोटे, कोण जाणणार? म्हणून जे जाणते हुशार असतात ते आधीच आपल्याला काही काळात नाही अशी भूमिका घेतात.
आपण मूर्ख, टोणपे आहोत, आपण काहीच नाही! असं सांगतात. आपल्यापेक्षा देव थोर आहे हा विचार ज्याला समजला तो जगाशी योग्य ते अंतर ठेवून राहतो. सभेमध्ये कलह झाला तर जाणत्यावर आरोप येतो, त्यामुळे अंतर राखायला शिकला नाही तो कसलं योगी? वैर केल्याने वैर वाढतं आपल्याला दुःख भोगांयला लागतं हे शहाणपणाचं रहस्य आहे. स्वतःला अखंडपणे सांभाळतो, कमीपणा येऊ देत नाही. थोर लोकांसाठी क्षमा शांती आवश्यक आहे. अवगुणी माणसापाशी गुणी माणूस बसल्यावर लगेच तुलनेमुळे अवगुण कळतात. विवेकाची पुरुषाची कृती विचारपूर्वक होते. नाना उपाय, दीर्घ चिकाटी धरून विचारपूर्वक प्रयत्न करील त्याचा महिमा तोच जाणतो. दुर्जनानी वाद-विवादात बेजार केल्यावर बाष्कळ लोकांनी डीवचल्यावर विवेकापासून दूर केला तर त्याला विवेकी कसं म्हणता येईल? न्याय, पर्याय, उपाय हे मूर्खाला कळतात का? मुर्खांमुळे सभेच्या चिवडा होतो. मग ते शहाणे लोक तो नीट करतात. स्वतः सहन करतात आणि सहन करायला लावतात स्वतः करतात आणि करायला लावतात.
पृथ्वीवर उदंड लोक आहेत. लोकांमध्ये सज्जन असतात. सज्जनांमुळे सगळ्या प्राणीमात्रांना समाधान होते. त्यांना मनोगताचं महत्व समजते. ते मान, प्रसंग, समय ओळखतात. संतप्त असेल त्याला नाना प्रकारांनी शांत करतात. असे जे जो जाणते लोक असतात त्यांचा विवेक समर्थ असतो. त्यांचे करणे लोकांना समजत नाही. अनेक जणांना चालवतो, नाना मंडळ हलवतो, अशी ही समर्थ पदवी विवेकामुळे मिळते. एकांतात विवेक धरावा. जगदीश धारणेने धरावा लोक आपले, परके म्हणूच नये. एकांतामध्ये विवेक सापडतो, एकांतामध्ये प्रयत्न सापडतात, एकांतामध्ये तर्क वावरतो. ब्रम्हांडाचे आकलन होते. एकांतामध्ये स्मरण करावं म्हणजे हरवलेला ठेवा सापडतो. अंतस्फूर्तीने कार्य करावे. ज्याला एकांत आवडला, त्याला सगळं आधी समजतं. त्यापेक्षा वडीलपणाला दुसरी जागाच नाही. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोता अवलक्षण नाम समास दहावा समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127