(खेड)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्या वतीने रविवार दिनांक ०७ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता गणेश मंगल कार्यालय, भरणे येथे विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यामध्ये खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५ वी, ८ वी मधील शिष्यावृत्ती गुणवत्ता धारक सर्व मुले, नवोदय विद्यालय निवड झालेले विद्यार्थी, नासा इस्रो भेटीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी, प्राथमिक शिक्षकांची इयत्ता ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक मुले व मार्गदर्शक शिक्षक , इयत्ता १०वी, १२वी उत्तीर्ण तसेच यावर्षी सर्व प्रकारची डिग्री डिप्लोमा व अन्य तत्सम कोर्स उत्तीर्ण मुले, NEET , JEE, MH-CET शिक्षणक्रम पात्र विद्यार्थी, BDS, MTS ऑलिम्पियाड, मंथन, होमी भाभा, अन्य तत्सम परीक्षा उत्तीर्ण मुले, तसेच क्रीडा क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरती नैपुण्य मिळवलेली मुले. आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यातील तालुक्यातील पहिले अनुक्रमे तीन शाळा, विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त शिक्षक, B.ed. M.A., M.ed. उच्च शिक्षित शिक्षक, खेड तालुक्यातील सेवानिवृत्त सर्व शिक्षक, अधिकारी तसेच सर्व नवनियुक्त शिक्षकांचे सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. वरील निकषाला पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी श्री. दिपक कांबळे सर (95526 82910) , श्रीकृष्ण खांडेकर सर (7588979332) , श्री.येडू केकाण सर (77698 76042) तालुका स्कूल यांच्याकडे करावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी राज्य सल्लागार श्री.विजय पंडित, राज्य ऑडिटर श्री.अंकुश गोफणे, कोकण विभागीय अध्यक्ष श्री.बळीराम मोरे, शिक्षक नेते दिलीप महाडिक,जिल्हाध्यक्ष श्री.दिपक शिंदे, जिल्हा सरचिटणीस श्री.संतोष पावणे यांचे सह राज्य व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, इतर तालुक्यांतील अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व खेड तालुक्यातील विद्यार्थी व शिक्षक यांनी या सन्मान सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष श्री.शरद भोसले व सहसचिव श्री.धर्मपाल तांबे यांनी केले आहे.