(राजापूर)
मे २०२४ मध्ये राजापूर तालुक्यात नव्याने हजर झालेल्या सुमारे १७४ नवनियुक्त शिक्षक बांधवांचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा राजापूर यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. डॉ .बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अगदी दिमाखात हा स्वागताचा सोहळा संपन्न झाला. या वेळी या सोहळ्यासाठी जिल्हा सरचिटणीस श्री.दत्तात्रय क्षिरसागर, जिल्हा सहसचिव महादेव बंडगर,लांजा तालुका अध्यक्ष श्री.प्रदीप मडवी यांनी विशेष उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन केले. तालुका सचिव श्री, सुरेश रेडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि थोडक्यात संघटनेची ओळख करून दिली, तसेच जिल्हा सहसचिव श्री विशाल घोलप सर यांनी संघटनेची पार्श्वभूमी व संघटना स्थापनेपासून आज पर्यंत संघटनेनी केलेला संघर्ष अगदी उत्तम रित्या मांडला. अमीर फकीर सर यांनी शालेय ऑनलाइन कामाबाबत मार्गदर्शन केले आणि श्री. उदय कुलकर्णी सर यांनी नवनियुक्त शिक्षण सेवकांना प्रशासकीय बाबतीत मार्गदर्शन केले.
जिल्हासचिव श्री.दत्तात्रय क्षिरसागर यांनी पतपेढी मध्ये सभासद होणेसाठी आवाहन करून त्यांना पतपेढी तर्फे असणारे लाभ, संघटनेने त्यांच्या नियुक्ती पासून केलेली कामे या बद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा सहसचिव श्री. महादेव बंडगर यांनी जुन्या पेन्शनची गरज आणि आज पर्यंत झालेली आंदोलने यांची माहिती दिली. तालुका अध्यक्ष श्री. जोतीबा पाटील सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले व अगदी मार्मिक शब्दात अध्यक्षीय समारोप करत उपस्थितांची मनेजिंकून घेतली आणि संघटनेबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला. पेन्शन शिलेदार संघटनेचे माजी कोषाध्यक्ष रोहिदास रोमन यांनी दूर वरून येऊन शुभेच्छापर मार्गदर्शन केले. नवनियुक्त शिक्षकांमधून प्रातिनिधिक स्वरुपात श्री. अहिरे सर आणि श्रीम.दर्शना नंदिवाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सौ. मनीषा सूर्यवंशी यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण निर्मिती केली. सूत्रसंचालनाची सौ.रुपाली नलावडे यांनी उत्तम रित्या पार पाडली. जिल्हा प्रतिनिधी रवींद्र नाडगौडा यांनी रंजकपणे सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष श्री.सुनील गोजारे, कोषाध्यक्ष श्री.अशोक साळुंके, प्रसिद्धी प्रमुख श्री.अमीर फकीर, तालुका संघटक श्री प्रशांत मुंडे,उपाध्यक्ष श्री.अमोल घुगे, तालुका सल्लागार श्री.तुकाराम भिसे, अरुण हिरवे, संदीप जाधव, जिल्हा प्रतिनिधी हेमंत मोरे, गणेश पाटील, गोविंद बाचीपल्ले, अक्रुदास कुसंगे, प्रसाद दरडे, कादर शेख यांच्यासोबत बीट संघटक, केंद्र संघटक व तालुक्यातील सर्व पेन्शन शिलेदार यांनी मोलाचे सहकार्य केले.