(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील घुडेवठार येथे राहणाऱ्या एकाची तब्बल २४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. मुंबईत असलेली रूम नावावर करून देतो असे सांगून दोघांनी फसवणूक केली. या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश यशवंत उग्रेजिया व दिनेश उग्रेजिया (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी त्यांची नावे आहेत.
ही घटना १४ मे २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घुडेवठार दत्तमंदिर, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुकेश भिमजी खाकोडीया (वय ४२, रा. घुडेवठार, दत्त मंदिरजवळ, रत्नागिरी) यांचे मामेभाऊ संशयित प्रकाश उग्रेजिया याच्या नावावर असलेली कर्वेनगर, कांजूरमार्ग पूर्व, मुंबई येथील रूम खाकोडीया यांच्या नावावर करून देतो, असे सांगून संशयितांनी फिर्यादी व त्याच्या भावाकडून २४ लाख ३५ हजार रुपये रोख ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले तसेच संशयित दिनेश उग्रेजिया याने प्रकाश याच्या सांगण्यावरून त्या रूमच्याऐवजी राममंदिरजवळ अंधेरी येथे दुसऱ्याच्या नावावर असलेली रूम फिर्यादी मुकेश खाकोडीयाला दाखवून फसवणूक केली. या प्रकरणी मुकेश खाकोडीया यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.