(खेड)
तालुक्यातील बोरज येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या आहे. सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार चार्जिंगच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहे.
ही घटना २५ जूनला दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी नीलेश बबन धोत्रे (वय ३७, रा. नातूनगर बौद्धवाडी, ता. खेड) यांनी तक्रार दाखल केली आहे. १ लाख ४० हजार रुपये किमतीचा एकूण ४ चार्जिंगच्या बॅटऱ्या प्रत्येकी ४८ व्होल्टच्या, व्हिजन कंपनीच्या १०० एएचच्या सफेद रंगाच्या प्रत्येक बॅटरीची किंमत सुमारे ३५ हजार रुपये आहे.