(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
कुणबी युवा,मुंबई आयोजित आणि युवा परिवर्तन तर्फे Youth Career Initiative (YCI) यांच्या माध्यमातून शनिवार दि.२९जून २०२४ रोजी सायं.५ वा.कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल) दामोदर हॉल समोर,सेंट झेवियर स्ट्रीट,मुं.१२ येथे मोफत हॉटेल मॅनेजमेंट सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी प्रथम https://forms.gle/bNDr3EirxpQerdo77 या लिंकवर आपले नाव नोंदवावे.
या सेमिनारच्या माध्यमातून कुणबी युवा युवक व युवतींसाठी आंतरराष्ट्रीय करिअरचे दरवाजे खुले करत आहे. कुणबी युवाच्या माध्यमातून आजवर ५३८ हुन अधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून ते आता देशविदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत आहेत.हे प्रशिक्षण मोफत असून विद्यार्थी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १८ ते २४ वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यांना दरमहा तीन ते पाच हजार रुपये स्टायफंड दिला जाणार आहे.जेवण व युनिफॉर्म देखील मोफत दिला जाणार आहे.दोन महिने कालावधीच्या या कोर्सचे प्रशिक्षण पंचतारांकित हॉटेलमध्ये दिले जाणार आहे.कोर्स आधी मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स घेतला जाणार आहे.
कोर्स पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना देश विदेशातील नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्य केले जाणार आहे.विद्यार्थ्यांनी येताना पासपोर्ट साईजचे दोन फोटो,आधारकार्ड झेरॉक्स दोन,दहावी- बारावी उत्तीर्ण गुणपत्रक झेरॉक्स देऊन यावे असे आवाहन कुणबी युवा मुंबईच्या वतीने करण्यात येत आहे.