(खेड)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडची सभा नुकतीच खेड नंबर १ या येथे तालुकाध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या कार्यकारिणीसाठी खेड तालुक्यातून द्यावयाच्या दोन जिल्हा प्रतिनिधींची एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झालेले संजय सुर्वे हे शिक्षक पतपेढीचे माजी संचालक असून त्यांनी खेड शिक्षक समितीचे सरचिटणीस पद ही भूषवलेले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता म्हणून संजय सुर्वे यांची ओळख आहे
त्याचप्रमाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झालेले श्रीकृष्ण सहदेव खांडेकर हे शिक्षक समितीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या आंबवली विभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते बीट शाळा आंबवली चे मुख्याध्यापक असून खो खो चे राष्ट्रीय पंच म्हणून जिल्हाभरात प्रख्यात आहेत त्याचप्रमाणे संघटनेसाठी सतत झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
या निवड प्रसंगी तालुकाध्यक्ष शरद भोसले, सहचिटणीस धर्मपाल तांबे, उपाध्यक्ष बबन साळवी, उपाध्यक्ष अनिल यादव संतोष चव्हाण, माजी जिल्हा प्रतिनिधी संजय गडाळे, प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर व दिलीप यादव, अनिल मोरे, संतोष मोरे, नवनीत घडशी, खेड शाळा नंबर एकचे मुख्याध्यापक येडू केकान, तुकाराम काताळे, बबन मोरे, भागोजी कडव, नारायण शिरकर, दीपक कांबळे, नितेश कांबळे, उदय रेडीज आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेमध्ये शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दिनांक सात जुलै रोजी दहा ते दोन या वेळेत गणेश मंगल कार्यालय भरणे येथे आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. शेवटी सहचिटणीस धर्मपाल तांबे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.