(चिपळूण)
शहरातील केक ऑफ द डे बेकरीमधील अस्वच्छतेचा प्रकार भाजप व मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या बेकरीच्या भटारखान्याची तपासणी केली असता, तिथे त्यांना प्रचंड अस्वच्छता आढळली. खराब झालेले केक, पाव आदी पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत. या बेकरी चालकांना तत्काळ सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
तसेच कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्याबाबत अवगत केल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. चिपळूण शहरात केक बनविणे व केक विक्रीच्या बऱ्याच बेकरी आहेत. चिपळुणातील काविळतळी परिसरातील बेकरीमधून उग्र वास येत असल्याचे भाजपा महिला पदाधिकारी राधा लवेकर व काही जागरूक महिलांच्या निदर्शनास येत होते. दरम्यान, याची पोलखोल करण्याचा या महिलांनी निर्धार केला आणि उघडकीस आणला.