(दापोली)
गरोदरपणत उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या 28 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची हृदय हेलावणारी घटना दापोली तालुक्यात घडली आहे. सायली सनी नागे (28) असे मृत तरुणीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी सायलीच्या पोटात दुखत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच श्वास घेण्यास तिला त्रास होऊ लागल्याने दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र सायली आणि बाळाला वाचवण्यात दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अपयश आले आहे. सायलीला तीन वर्षाची एक लहान मुलगी आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नातेवाईकांनी या महिलेला शुक्रवारी दवाखान्यात आणलं, त्याचवेळी त्यांचा ऑक्सिजन हा 40 ते 45 दरम्यान होता. त्यामुळे अन्य ठिकाणच्या तज्ञ डॉक्टरांनी वाचवण्यासाठी शर्तीचे केले. मात्र दुर्दैवाने त्यांचा जीव वाचू शकला नाही. चार ते पाच दिवसांपूर्वी सायली उपजिल्हा रुग्णालयात आली होती. त्यावेळेला तिची प्रकृती चांगली होती, सोनोग्राफीचा रिपोर्टही नॉर्मल आला होता अशी माहिती दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.