( रत्नागिरी )
तरुण पिढी आणि विवाह संस्था यामध्ये होत असलेल्या घटनांबद्दल ज्वलंत भाष्य करणारे व विवाह या संकल्पनेची जाणीव करून देणार ‘चल लग्न करू’ नाटकाच रत्नागिरीच्या युवकांनी प्रमोशन केलं. प्रायोगिक थिएटर्स रत्नागिरी आणि ब्लॅक माईंड क्रिएटिव्ह टिम यांच्यातर्फे रत्नागिरीच्या नाट्यचळवळीत पहिल्यांदाच नाटकाचे प्रमोशन करून युवकांनी एक नवा पायंडा रचला आहे.
या कार्यक्रमात प्रदिप शिवगण विभाग प्रमुख, रमेश कीर कला अकादमी, साईराज चव्हाण, डॉ. नितीन चव्हाण चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी, गुरू चौगुले, अध्यक्ष फोटोग्राफर असोसिएशन रत्नागिरी आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन झाल्यानंतर आर्या शेट्ये हिने कार्यक्रमाची धुरा सांभाळली. नाटकाच्या शिर्षक गीताने नाट्यरसिकांना मोहून टाकले. HM स्टुडिओचे सर्वेसर्वा हरिश माने यांनी या नाटकाचे शीर्षक गीत लिहिले असून शैलेश इंगळे यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.
शशिकांत गुरव व विनायक घगवे लिखित, अमर खामकर दिग्दर्शित, ‘चल लग्न कर’ हे दोन अंकी नाटक 15 एप्रिल पासून रंगभूमीवर पदार्पण करत आहे. या नाटकात श्रद्धा सुर्वे, दीपक माणगावकर, मिताली राऊत, श्रेयस माईन आणि विनायक घगवे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नाटकाचे निर्माता रत्नागिरीचे युवा व्यक्तीमत्व परिमल प्रसाद कुलकर्णी आहेत. तर नाटकाची तांत्रिक बाजू प्रकाश ठिक (रंगभूषा), चिन्मय जोशी, शैलेश इंगळे (संगीत), स्वानंद शिंदे (प्रकाश योजना), स्वप्नील जाधव (नेपथ्य), ऐश्वर्या शिंदे, अरुण रांबाडे (प्रोडक्शन) हे सांभाळत आहेत.तसेच मिडिया पार्टनर पुणे फिल्म्स, आणि स्टार 5 लाईव्ह तर ब्रॅण्ड पार्टनर म्हणून आहिश क्लीन केअर क्लिनिक अॅंड आहिश मेडिकल , मोबाईल वर्ल्ड आणि चौगुले फोटो स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमाच्यावतीने ‘चल लग्न करू’ च्या संपूर्ण टीमने समस्त रत्नागिरीकरांना नाटक पाहण्यासाठी आणि नाटकाला प्रतिसाद देण्याकरिता आवाहन केले आहे.