(संगमेश्वर)
तालुक्यात अनेक वर्षे करजुवे, विचारेवाडी, बुरंबी घेवदे कासार कोळवण बावनदी येथे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असून करोडो रुपयांचा महसूल संबंधित अधिकारी बुडवत आहेत. याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांना सर्व पुरावे सादर करुन कारवाईची मागणी करणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते मनोहर गुरव यांनी सांगितले आहे.
भर दिवसाही वाळू उपसा होत असून वाळू वाहतूक होत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारदारांनी पुरावे देऊनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास येत आहे. दि. ३० मे २४ रोजी ही अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली बिनधास्त वाळू उपसा, वाळू साठा, वाळू वाहतूक होत आहे.
तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग देवरुख, तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी यांनी तक्रारदारांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध प्रकरणाचे दिलेल्या अर्जाना केराची टोपली दाखवली जात आहे. कर्तव्यात कसूर व दप्तर दिरंगाई तक्रारदारांना दिलेल्या त्रासाबद्दल, सखोल चौकशी व्हावी व दोषी अधिकारी व कर्मचारी वर्गावर कठोर कार्यवाही करावी, त्याचप्रमाणे सेवा पुस्तकामध्ये नोंद व्हावी, यासाठी मुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री जिल्हाधिकारी यांना पुराव्यासह अर्ज देणार असल्याचे व सह्याद्री नगर साडवली येथील सी.सी. टी. व्ही. फुटेज व इतर ठिकाणची सी.सी.टी.व्ही. फुटेजची मागणी करण्यात येणार आहे.
विविध विभागांचे विरुद्ध दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपोषणात सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे संगमेश्वर तालुका अध्यक्ष व कार्यकर्ते, तक्रारदार, नागरिक, मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कारवाई करणार का?
या राजरोस अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी असून देखील तहसीलदार कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित होत असून याबाबत आता रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी राजरोस सुरू असलेल्या वाळू उत्खननाबाबत सखोल चौकशी करून वाळू माफियांवर कठोर कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.