(चिपळूण)
चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात शैक्षणिक विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या विस्तार अधिकारी नसरीन खडस यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगावी यांच्यावतीने हा सन्मान गोवा येथे नुकताच पार पडला.
या पुरस्कारासाठी दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या राज्यांमधून नसरीन खडस यांची निवड करत राष्ट्रीय आदर्श शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे अनेक व्यक्ती आणि अधिकारी यांनी नसरीन खडस यांच्या नावाची या पुरस्कारासाठी शिफारस केली.
नसरीन खडस यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी पुरस्कार मिळाल्याने त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार, अधिकारी पदाधिकारी , अनेक शिक्षकांनी तसेच त्यांच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.