(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सर्वे नंबर दोन मध्ये असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी व मोरया चौक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्टॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तशा स्वरूपाची जाहीर नोटीस गणपतीपुळे ग्रामपंचायती कडून काढण्यात आली असून ती स्टॉल धारकांना देण्यात आली आहे.
या जाहीर नोटीसमध्ये गणपतीपुळे ग्रामपंचायतीने म्हटले आहे की, गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सर्वे नंबर दोन मध्ये समुद्रकिनारी, मोरया चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्टॉल धारक व हातगाडी व्यावसायिकाना आपले व्यवसाय चालू ठेवण्याची मुदत 31 मे पर्यंत आहे. त्यामुळ सदर सर्व स्टॉलधारकांनी आपले स्टॉल दिनांक 31 मे पासून बंद करावे, असे आदेश देण्यात आहेत. तसेच तसेच दिनांक 31 मे रोजी मे रोजी सर्व स्टॉल धारक व हातगाडी व्यवसायिकांनी आपले स्टॉल बंद करून बंद करून 31 पासून ग्रामपंचायतीला सहकार्य करावयाचे आहे. तसेच आपली जागा मोकळी करावयाची आहे असे स्टॉलधारकांना कळविण्यात आले आहे. त्यानंतर जे हातगाडी व्यवसायिकव्यवसायिक व स्टॉल धारक आपले स्टॉल चालू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे गणपतीपुळे ग्रामपंचायतने आपल्या जाहीर नोटीसीमध्ये पुढे म्हटले आहे.
गतवर्षी गणपतीपुळे समुद्रकिनारी मे महिन्याच्या अखेरीस गणपतीपुळे समुद्राला मोठे उधाण आल्याने मोठ्या लाटांचा मारा समुद्रकिनाऱ्यापर्यंत धडकला होता. या मोठ्या लाटांच्या तडाख्यात गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्टॉल धारकांचे व हातगाडी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गतवर्षी या नुकसानग्रस्त स्टॉल धारकांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संबंधित स्टॉलधारकांना आपल्या सामंत कुटुंबीयांतर्फे वैयक्तिकरित्या मदतही केली होती. त्यामुळे गतवर्षीची प्रचिती यंदाच्या पावसाळ्यात येऊ नये तसेच कुठलाही मोठा धोका उद्भवू नये याकरिता गणपतीपुळे ग्रामपंचायतच्या स्थानिक आधीच आगाऊ जाहीर नोटीस दिली असल्याचे दिली असल्याचे बोलले जात आहे.
तसेच तसेच सध्या गणपतीपुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढू लागली असून यंदाही मोठ्या लाटा निर्माण होणार तर नाही ना? अशी भीती स्थानिक व्यवसायिकांमध्ये लागून राहिली आहे. दरम्यान दरम्यान, गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांचे खास आकर्षण असलेले वॉटर स्पोर्ट व्यवसाय संबंधित व्यवसायिकांनी शनिवारपासून बंद केले आहेत. दरवर्षी गणपतीपुळे येथील मोरया वॉटर स्पोर्ट अँड बीच असोसिएशनच्या माध्यमातून गणपतीपुळे समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट व्यवसाय योग्य प्रकारे केला जातो. या कालावधीत समुद्रात बुडणाऱ्या व्यवसायिकांचे प्राणही वाचवले जातात, मात्र या व्यवसायिकांना दरवर्षी 25 मे पर्यंत व्यवसाय चालू ठेवण्याची मुदत असते. या मुदतीच्या आदेशाचे पालन करीत मोरया वॉटर स्पोर्टच्या वतीने आपले वोटर स्पोर्ट व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. एकूणच वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय बंद झाले असले तरी गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी अद्याप दिसून येत आहे, त्यामुळे आता पर्यटकांना वॉटर स्पोर्ट व्यवसायाची उत्सुकता मात्र लागून राहीली आहे.