( चिपळूण )
मत्स्यगंधा एक्सप्रेसने उडवी ते चिपळूण असा रेल्वेने प्रवास करताना महिलेचे 1 लाख 20 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशिला सुधकार शेट्टी (73, गोवंडी) या मत्स्यगंधा एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. उडवी ते चिपळूण या प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली. याच संधीचा फायदा घेत चोरटयाने रुमालामध्ये ठेवलेली सोन्याची चेन, पेन्डंन असा सुमारे 1 लाख 20 हजारांचा माल चोरला.
याबाबतची फिर्याद सुशिला शेट्टी यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दाखल केली. त्यानुसार अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.