(रत्नागिरी)
तालुक्यातील मौजे गोळप मुसलमानवाडी गावी ईनामदार यांचे मालकिचे आंबा बागेमध्ये राखणीसाठी असलेले नेपाळी गुरखे (१) खडकबहादुर बलराम थापा क्षेत्री (वय ७२ वर्षे) व (२) भक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री (वय ६७ वर्षे दोन्ही रा. लम्की चुहा, नगरपालिका नं. ४. चौरीपुर, कैलाली देश नेपाळ) यांना कोणीतरी अज्ञात आरोपी याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन धारदार हत्याराने व दगडाने शरीरावर मारुन, गंभीर दुखापती करुन, जीवे ठार मारले. म्हणुन यातील आंबा बागायतदार मालक श्री. मुसद्दिक मुराद मुकादम रा. गोळप, ता.जि. रत्नागिरी यांनी अज्ञात आरोपी विरुध्द पुर्णगड पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. याबाबत पुर्णगड पोलीस ठाणे गु.नों.क्र. ३७/२०२४, भादसे कलम ३०२ प्रमाणे दि. ३०/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी विभाग श्री. निलेश माईनकर हे करत होते. तसेच सदरची माहिती प्राप्त होताच मा. पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन पावस येथे जावुन आरोपी यांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचया पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी दोन सख्ख्या भावांना माहितगार व्यक्तीने मारल्याबाबत खात्री पटली. वस्तुस्थितीदर्शक पुरावा प्राप्त झाल्याने दोन्ही मयत ज्याठिकाणी मिळुन आले त्याठिकाणचे आजुबाजुच्या परिसरातील आंबा बागायदार तसेच त्यांचेकडे राखणदारी करीता असलेले नेपाळी गुरखे यांचेकडे कसून चौकशी सुरु केली असता, चौकशीमध्ये यातील मयत यांना गोळप येथील आंबा बागेमध्ये राखणदार करणारा नेपाळी सरणकुमार ऊर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा, वय ५८ वर्षे, रा. गाव टिकापुर, नगर परिषद वॉर्ड क्र. १, जि. कैलाली, देश नेपाळ यांने तत्कालीक कारणावरुन जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दि. ०३/०५/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सदर कामगिरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर, सहा. पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, योगेश खोंडे, यांचेसह पुर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. धायरकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला आहे.