(राजापूर)
आज राजापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी राजापुरात माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांची भेट घेतली. अॅड. सौ. खलिफे यांच्या कार्यालयात ना. राणे यांनी अॅड. सौ. खलिफे यांची भेट घेतली व राजापूर शहरासह तालुक्यातील एकूणच विकासात्मक कामांबाबत चर्चा केली.
ना. राणे यांनी आज राजापुरात अनेक मान्यवरांच्या भेटी घेत त्यांच्याशी थेट संवाद साधला. अॅड सौ. खलिफे यांचे देखील राणे कुटुंबाशी कौटुंबीक संबध आहेत. राजकारणा पलिकडे नाती जपणारे नेतृत्व अशी ना. राणे यांची ओळख आहे.
अॅड. सौ. खलिफे या मुळच्या कणकवलीच्या असून त्यांचे पुर्वीपासूनच राणे कुटुंबीयांशी कौटुंबिक संबध आहेत. मंगळवारी राणे यांनी अॅड. सौ. खलिफे यांच्या तहसीलदार कार्यालया जवळील कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी ना. राणे यांनी अॅड. सौ.खलिफे यांनी नगराध्यक्ष म्हणून शहरात केलेली विकास कामे, आमदार म्हणून केलेले काम यांसह अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजिम जैतापकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.