(राजापूर)
राजापूर शहराला उर्जीतावस्था येण्यासाठी येथील भौगोलिक परिस्थीती आणि सोयी सुविधा यांची सांगड घालून एक निश्चित आराखडा बनवून त्याचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. तर व्यापाऱ्यांनी अल्पसंतुष्ट न राहता व्यापार, उदीम वाढावा म्हणून आपल्या मानसिकेतून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या उद्योग व्यवसायांना विरोध न करता त्यांचे स्वागत केले पाहिजे असे आग्रही मत महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी यावेळी मांडले. राजापूर शहरातील प्रलबंती प्रश्नांसह व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कायमच कटीबध्द असल्याची ग्वाहीही ना. राणे यांनी यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांना दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी राजापूरातील व्यापाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. व्यापारी संघाचे अध्यक्ष संदिप मालपेकर यांच्या निवासस्थानी नाम. नारायण राणे यांनी व्यापारी आणि नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला.व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी नाम. नारायण राणे यांचे स्वागत केले.
याप्रसंगी व्यापारी संघाचे उपाध्यक्ष दिनानाथ कोळवणकर, विजय हिवाळकर, प्रशांत पवार, राजन नवाळे, अनंत रानडे, प्रकाश कातकर, विनय गादीकर, राजेंद्र कुशे, रमेश पोकळे, अलोक रेडीज, गुरूनाथ भोगटे, दिलीप गोखले, शैलेश आंबेकर, भिमजी मंगे, विमा व्यवसायिक पळसुलेदेसाई, शैलेश आंबेकर, अॅड. चंद्रशेखर अभ्यंकर, अद्वैत अभ्यंकर, श्री. संसारे, राजन रानडे, नितीन कुशे, अक्षय पोकळे आदींसह शहरातील व्यापारी उपस्थीत होते.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, अनिल ठाकुरदेसाई, सौ. श्रृती ताम्हनकर, शहर अध्यक्ष विवेक गुरव, युवकचे शहर अध्यक्ष संदेश आंबेकर, अरविंद लांजेकर, सोनल केळकर आदींसह मालपेकर परिवारातील आनंद मालपेकर, सौ. संजिवनी मालपेकर, सौ. मेघना मालपेकर, निहार मालपेकर, निराग मालपेकर, सौ. लिना मापलेकर खेडेकर, उपस्थीत होते.
यावेळी संदीप मालपेकर यांनी स्वागत करताना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमाणे आमच्या राजापूरचा विकास आपल्या माध्यमातून व्हायला हवा. दरवर्षी येणारा पूर आणि जाचक पुररेषेतून सुटका व्हायला हवी. देवस्थान इमानचा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न सुटला पाहिजे तसेच या ठिकाणी चांगल्या आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा निर्माण व्हायला हव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. तर उपस्थीतांमधुन दिलीप गोखले यांनी राजापूर शहराचा पाण्याचा प्रश्न करोडो रूपये खर्चुनही सुटत नाही दरवर्षी तीव्र पाणी टंचाई सामना करावा लागतो. पावसाळयात पूर आणि उन्हाळयात पाणी टंचाई अशी विचित्र स्थीती असल्याचे गोखले यांनी सांगितले.
या सर्व सूचनांचा परामर्श घेताना नाम. राणे यांनी राजापूर शहराचा पाणी प्रश्न आणि पूर रेषेचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्थानिक नगर परिषदेकडे पाठपुरावा केला पाहिजे. पूर रेषेचा प्रश्न गाळ उपशाने सोडवता येईल. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक आहे. देवस्थान इनाम विषयी सविस्तर माहिती निवेदन दया. त्याचा आपण निश्चीतपणे पाठपुरावा करू असे सांगितले. तर सिंधुदुर्ग जिल्हाप्रमाणे रत्नागिरीचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी येणाऱ्या उद्योग व्यवसायांना पाठींबा दिला पाहिजे. विकास व्हायचा तर जमिनी दिल्या पाहिजेत. तरच दळणवळणाच्या सुविधा निर्माण होतील. तर व्यापाऱ्यांनी आपल्या पारंपारिक व्यवसायावर अल्पसंतुष्ट न राहता आपल्या मालाला मोठी बाजारपेठ शोधली पाहिजे. शासनाने निर्माण केलेल्या सोयी सुविधांचा फायदा घेवून आपल्या व्यवसाय वाढविला पाहिजे. मुबलक पाणी असेल तर दुग्धव्यवसायासारखे उद्योग केले पाहिजेत. त्यातून रोजगार मिळेल दरडोई उत्पन्न वाढेल. मात्र त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी नाम. राणे यांनी उपस्थीत व्यापाऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला.