(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौध्दवाडी येथील बौध्दजन पंचायत समिती,शाखा क्र.१७ तथा बौध्द ग्रामस्थ मंडळ यांचे विद्यमाने परमपूज्य,महामानव,भारतरत्न डॉ.भिमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती महोत्सव रविवारी दि.१४ एप्रिल रोजी “धम्मचेतना बुध्दविहार”येथे मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला .या जयंती कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्मचेतना बुद्धविहाराच्या प्रांगणात निळ्या पक्षीय ध्वजाचे ध्वजारोहण रमाकांत भागोजी पवार (मुंबई)आणि पंचशिल धम्म ध्वजाचे ध्वजारोहण प्रज्ञा प्रकाश पवार (अध्यक्षा-महिला मंडळ) यांच्या शुभहस्ते पार पडले. त्यानंतर बौद्धाचार्य वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक बुध्दपुजापाठ घेण्यात आला.
या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व सभासद बंधू-भगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी मालगुंड गणपतीपुळे येथील पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी संदीप साळवी, जयेश कीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात बौद्ध ग्रामस्थ मंडळ मालगुंड- मुंबई चे जेष्ठ सभासद रमाकांत पवार, स्थानिक मंडळाचे उपाध्यक्ष भारत पवार, बाल विद्यार्थीनी सान्वी अक्षय पवार, आकांक्षा अमित कांबळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याविषयी मनोगते व्यक्त झाली. त्यांनतर मालगुंड- गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षीय मनोगतातून प्रकाश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी आभारप्रदर्शन व सरणत्तय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.