(रत्नागिरी)
दुचाकीस मागून ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढील दुचाकीला धडक देत अपघात करुन पळ काढणाऱ्या डंपर चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना पेट्रोलपंपासमोर शनिवार ६ एप्रिल रोजी सकाळी ११.१५ वा. हातखंबा घडली.
नीरज गणपत रेवाळे (२५, रा. भोके रेवाळेवाडी, रत्नागिरी) असे अपघातातील जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एआर- ३०३४) घऊन खेडशीहून आपल्या घरी जात होता. त्याच सुमारास त्याच्या मागून येणारा डंपर (एमएच- ४६-बीएफ-१०४४) वरील चालकाने हातखंबा येथील पेट्रोल पंपासमोर निरजच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना त्याला मागून धडक देत अपघात केला. यात नीरजच्या डोक्याला, दोन्ही पायांना व हातांना दुखापत झाली. अपघात केल्यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असून, अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
Also Read :
सावधान! आजचे सूर्यग्रहण स्मार्टफोन खराब करू शकतो; नासाचा इशारा |
सुसाट डंपर चालकांवर कारवाई करा अन्यथा….
महामार्गाचे काम करणारे डंपर चालक छोट्या-मोठ्या गाड्यांची पर्वा न करता खोदाई केलेल्या रस्त्यावरूनही सुसाट वेगाने मार्गक्रमण करीत असतात. डंपर चालक आणि दुचाकीस्वारांची काही वेळेस बाचाबाची देखील होते. डंपर चालक बेदरकारपणे वाहने चालवून अपघाताला आमंत्रण देत आहेत. महामार्गाचे काम सुरू असल्याने सर्वच अवैध्य वाहतूक करणाऱ्या वाहनांचेही चांगलेच फावले आहे. याकडे आरटीओ विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करून छुप्या पद्धतीने आशीर्वाद देत आहेत का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या चालकांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा यांना वाहतुकीचे नियम शिकवावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1