(गुहागर)
उमराठ गावचे सुपुत्र आणि कदम (बौद्ध) वाडीतील बौद्धजन ग्रामस्थ मंडळाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. संजय बेंडू कदम यांचे नुकतेच सोमवार दि. १.४.२०२४ रोजी अल्पशा आजाराने मुंबई पनवेल येथील एम. जी. एम. हाॅस्पिटल येथे उपचारादरम्याने दुःखद निधन झाल्याचे समजले. त्यांचे वय अंदाजे ६५ होते.
कै. संजय बेंडू कदम हे उमराठ कदम(बौद्ध) वाडीच्या विकासकामात तसेच सर्व कार्यक्रमांत सदैव सक्रिय सहभागी असायचे. ते अतिशय शांत, सरळ, सुस्वभावी, प्रेमळ, परोपकाराची व समाज कार्याची सतत तळमळ असणाऱ्या व्यक्तीमत्वाचे होते. उमराठ गावाच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. उमराठ गावाप्रती असलेल्या प्रेमापोटी त्यांचे वडील कै. बेंडू चांगाजी कदम यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्रामपंचायत उमराठ कार्यालयासाठी आपली जागा ग्रामपंचायत स्थापने पासूनच सन १९५९ साली उदारहस्ते बक्षीस पत्राद्वारे विनामूल्य दिलेली आहे. पुर्वी जुनी इमारत होती. त्यानंतर सन २००८ मध्ये ग्रामपंचायत उमराठची नवीन इमारत उभारण्यात संजय बेंडू कदम यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच सद्याची टूमदार इमारत उभी राहिलेली आहे.
Also Read : तळहातावर कोठे असते अपत्य रेषा; मूल होण्याचा कार्यकाळ कशी दर्शवते अपत्य रेषा
कै. संजय बेंडू कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुलगे, सून, नात असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटूंबियांवर आणि कदम(बौद्ध) वाडीवर दुखाःचे सावट पसरलेले आहे. या दुखाःतून बाहेर येण्यासाठी/ सावरण्यासाठी त्यांच्या कुटूंबियाना धैर्य, ताकद आणि शक्ती मिळो, तसेच दिवंगत कै. संजय बेंडू कदम यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी उमराठ बौद्धजन ग्रामस्थ मंडळातर्फे तसेच ग्रामपंचायत उमराठ परिवारातर्फे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1