(चिपळूण)
संगमेश्वर ते दापोली एसटीतील महिलेचे तीन अज्ञात महिलांनी तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी तीन महिलांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बहाद्दूरशेख नाका परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याची फिर्याद संजना सचिन पाष्टे यांनी दिली आहे. त्या मुलासह आवाशी येथे जाण्यासाठी सायंकाळी ६.३० वाजता शहरातील बहाद्दूरशेख नाका येथून संगमेश्वर ते दापोली या बसमध्ये चढल्या. त्यावेळी त्याच्या पाठीमागून ३ अनोळखी महिला बसमध्ये चढल्या होत्या. बस काही अंतरावर गेल्यावर त्या तीन महिलांनी बस कंडक्टरला आम्हाला रत्नागिरी येथे जायचे आहे. चुकून या बसमध्ये बसलो, असे सांगून त्या बसमधून उरतल्या. त्याच दरम्यान प्रवासात असलेल्या पाष्टे यांना दागिने चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्या ३ अनोळखी महिलांनी हे दागिने चोरून नेले, असा पाष्टे यांचा संशय आहे.