(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी कुंभवणेवाडी येथील शेतकरी गजानन मोरेश्वर घाणेकर यांचा बैल बिबट्याने हल्ला करुन फस्त केला आहे. त्यामुळे कळझोंडी गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी कळझोंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
दिनांक २ एप्रिल पासुन हा बैल घरी आला नसल्याने येथील शेतकरी गजानन घाणेकर यांनी सर्वत्र शोध मोहिम राबवली. तरीही सापडला नाही. मात्र चार दिवसानंतर जंगलात दुर्गंधी पसरल्यामुळे या बैलाचा शोध दि.६ एप्रिल रोजी लागला. त्यावेळी या बैलाला बिबट्याने फस्त केलेला आढळला.
सदर घटनेची माहिती समजताच कळझोंडी गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदिप पवार,गावच्या सरपंचदिप्ती वीर, सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार, पांडुरंग सनगरे, वासुदेव घाणेकर, सौ.घाणेकर व कुंभवणे वाडीतील ग्रामस्थ, भगिनी उपस्थित होत्या. सदर घटनेची माहिती सरपंच सौ.दिप्ती वीर यांनी वनविभागाच्या सौ.कुबल यांना दिली.