(रत्नागिरी)
जनावरांची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडून दोघांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन बैलांस एक चारचाकी गाडी असा १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उक्षी (ता. रत्नागिरी) येथील तपासणी नाक्यावर बुधवारी दुपारी ३:३० वाजता करण्यात आली.
मोहन नारायण रहाटे (वय ५४, रा. देवधामपूर तेलीवाडी, संगमेश्वर), सचिन प्रकाश रहाटे (३५, रा. नांदळज रहाटेवाडी, संगमेश्वर) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे बुधवारी दुपारी चारचाकी (एमएच १४, सीपी ७३१८) गाडीमधून १० हजार रुपये किमतीचा चार वर्षांचा व आठ हजार रुपयांचा तीन वर्षांचा गावठी बैलांची बेकायदेशीपणे वाहतूक करीत होते.
त्यांची गाडी उक्षी तपासणी नाक्यासमोरील रस्त्यावर आली असता पोलिसांनी गाडीची तपासणी केली. तेव्हा त्यांना गाडीत बांधलेले बैल आढळले. पोलिसांनी ही गाडी व जनावरे ताब्यात घेतली असून, संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा वाहतुकीमध्ये प्राण्यांना अतोनात त्रास होत असल्याने त्याबाबत गांभीर्याने कारवाई केली जाते