(महाड)
महाड विन्हेरे राज्यमार्ग क्रमांक 72 वर रात्री एक वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर गुरे आडवी आल्याने अचानक ब्रेक लावून झालेल्या अपघातात ईरटीका कार जागेवर पलटी होऊन त्यामधील सहा जण जखमी झाल्याची घटना महाड जवळील शिरगाव गावाच्या हद्दीत घडली.
वसई येथून एम एच 47 एजी 66 10 या ईरटीका कार मधून प्रवास करीत असताना महाड जवळील शिरगाव ग्रामपंचायत गोमंतक जवळ रस्त्यावर अचानक गुरे आडवी आल्याने ब्रेक लावून झालेल्या अपघातात ईरटीका कार जागेवर पलटी होऊन त्यामधून प्रवास करणारे सहा जण जखमी झाले आहेत त्यांना महाड मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
ईरटीका कार मधून प्रवास करणाऱ्या व गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे सागर वसंत गुंजाळ (वय वर्षे ते 30 राहणार अंधेरी), रोशन कृष्ण मोहन त्रिपाठी (वय वर्ष 28 राहणार वसई), सोनू राजाराम पटेल (वय वर्ष 30 राहणार वसई), राजेश मुकुंद निर्भवते (वय वर्षे 50 राहणार गोरेगाव मुंबई), पंकज प्रकाश पवार (वय वर्षे 50 राहणार गोरेगाव मुंबई), देवदत्त वासुदेव घाटी (वय वर्ष ते 30 राहणार विरार) हे जखमी झाले असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा तपास महाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लांडगे करीत आहेत