(संगमेश्वर / एजाज पटेल)
लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खेडेगावातून शहरात येऊन अनेक अडचणींना समोरे जात आपले स्वप्न सत्यात उतरवणारे डॉ. सुशील वैशाली सुनील मोहिते यांनी एम.बी.बी. एस. पदवी प्राप्त केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बौध्द वाडी येथील डॉ. सुशील वैशाली सुनील मोहिते यांनी डॉ. आर. एन. कुपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल अँड हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज, जुहु, मुंबई येथून एम.बी.बी.एस. ही पदवी प्राप्त केली. तेरे गाव बौध्द वाडीतील एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त करण्याचा पहिला बहुमान सुशील यांना मिळाला आहे. वडिल सुनील गंगाराम मोहिते आणि आई अॅड वैशाली सुनील मोहिते यांनी सुशील यांना डॉक्टर करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
सुशील यांनी मिळवलेल्या यशामुळे आई वडिल अतिशय आनंदी आहेत, असे त्यांनी म्हटले. या शैक्षणिक प्रवासात ज्यांनी मदतीचा हात दिला. त्या सर्वांचे डॉ. सुशील यांनी आभार व्यक्त केले आहे. डॉ सुशील यांचे समस्त नातेवाईक, आप्तेष्ट,आणि ते-ये गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या कडून तसेच तालुक्यातील सर्वस्तरातून आणि मित्र परिवार यांच्या डॉ.सुशील मोहिते यांचे कौतुक होत आहे